i-pill FAQs
 
   

पुढची मासिक पाळी येईपर्यंतचे प्रभावी गर्भनिरोधक म्हणून आय-पिल काम करते का?

 
 
  इमर्जन्सी कॉन्ट्रॅसेप्टिव पिल म्हणजे काय?
  असुरक्षित संभोगानंतर किंवा कॉन्ट्रॅसेप्टिवचे अपयश यामुळे येणारी अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी टाळण्याचा सुरक्षित आणि सोपा उपाय म्हणजे इमर्जन्सी कॉन्ट्रॅसेप्टिव पिल.
 
 
 
   
  आय-पिल काय आहे?
  आय-पिल ही सिप्लाने तयार केलेली इमर्जन्सी कॉन्ट्रॅसेप्टिव पिल आहे. असुरक्षित संभोगानंतर किंवा गर्भनिरोधकाच्या अपयशामुळे, नको असलेली (अनइन्टेन्डेड) प्रेग्नन्सी टाळण्याचा सुरक्षित आणि सोपा उपाय आय-पिलचा सिंगल डोस पुरवितो. आय-पिल डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय सर्व केमिस्टकडे उपलब्ध आहे.
 
 
 
 
  आय-पिल केव्हा घेणं योग्य?
 

असुरक्षित संभोगानंतर प्रेग्नन्सीची संभावना टाळायची असेल तर आय-पिल शक्य तितक्या लवकर म्हणजे 12 तासांच्या आत घ्यावी. किंवा निदान 72 तासांच्या आत घ्यावी.

आय-पिल पुढील परिस्थितीमध्ये पूरक संतती नियमन पद्धत म्हणूनही उपयोगी पडते:

  • कॉन्ट्रॅसेप्टिवचे अपयश
  • असुरक्षित संभोग
  • नियमित बर्थ कंट्रोल मेथडचा चुकीचा उपयोग
  • जबरदस्ती संभोग
 
 
 
 
  आय-पिल कशी घ्यावी?
 

आय-पिल ही सिंगल डोस टॅब्लेट असून ती तोंडावाटे घ्यायची आहे. जेवल्यानंतर एक ग्लासभर पाण्याबरोबर ती गिळायची असते. आय-पिल शक्य तितक्या लवकर घ्यावी आणि असुरक्षित संभोग किंवा गर्भनिरोधकाच्या अपयशानंतरच्या 72 तासाच्या आत घ्यावी.

 
 
 
 
  आय-पिल घेणे केव्हा योग्य नसते?
 

तुम्ही आधीच प्रेग्नन्ट असाल तर, आय-पिल काम करणार नाही, कारण ती गर्भनिरोधाची केवळ पूरक किंवा अत्यंत निकडीच्या वेळची पद्धत आहे. नेहमीच्या गर्भनिरोधक पद्धतींचा तो पर्याय नव्हे. आय-पिल असुरक्षित संभोगानंतर 72 तासांनी घेतल्यास प्रभावी ठरणार नाही.

लेवोनोर्जेस्ट्रेलची एलर्जी असल्यास आय-पिल घेऊ नये. आय-पिलमधील औषधाचे ते नाव आहे.

 
 
 
 
  आय-पिल कुणी घ्यावी?
  मूल होण्याच्या वयातील आणि कॉन्ट्रॅसेप्टिव नसल्यामुळे किंवा ते अपयशी ठरल्यामुळे नको असलेली प्रेग्नन्सी येईल अशा परिस्थितीशी सामना करावे लागेल असे वाटणार्‍या कुणाही स्त्रीला आय-पिल घेता येईल. बलात्कार किंवा जबरदस्ती संभोगाच्या बाबतीतही ती घेता येईल.
 
 
 
 
  आय-पिल घेण्यापूर्वी मी डॉक्टरांकडून चेक-अप करून घ्यावा काय?
 

आय-पिल घेण्यासाठी मेडिकल चेक-अपची गरज नाही. मात्र, तुम्हाला एखादा गंभीर आजार असल्यास किंवा लेवोनोर्जेस्ट्रेलची ज्ञात एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

 
 
 
 
  आय-पिल कशी काम करते?
 

आपल्या मासिकपाळी चक्रामध्ये तुम्ही कुठे आहात त्यावर अवलंबून भिन्न अशा तीनपैकी कुठल्याही प्रकारे आय-पिल काम करू शकते:

  • ती बीजकोशातून बीजांडं बाहेर सोडणं थांबवू शकते.
  • बीजांडं आधीच बाहेर पडलं असेल तर ती शुक्रजंतूला ते फलित करण्यापासून अटकाव करू शकते.
  • बीजांडं जर आधीच फलित झालं असेल तर ती पिल त्यास गर्भाशयाच्या अंतर्भागास जुळण्यास अटकाव करू शकते.

लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सी ही फलित बीजांडं स्वत:हून गर्भाशयास जुळल्यानंतरच निश्चित होते.

प्रेग्नन्सी निश्चित झाल्यास (म्हणजे फलित बीजांडं स्वत:हून गर्भाशयाला जुळल्यास) आय-पिल प्रभावी ठरत नाही, म्हणून ती अ‍बॉर्शन पिल नाही.
 
 
 
 
  · 'इमर्जन्सी कॉन्ट्रॅसेप्टिव पिल' ही 'अ‍बॉर्शन पिल' पेक्षा वेगळी कशी?
 

वैद्यकीय भाषेत सांगायचे झाल्यास, फलित बीजांड गर्भाशयाच्या अंतर्भागास जोडले गेले की प्रेग्नन्सी सुरू होते.

अ‍बॉर्शन पिल्समध्ये एप्रोजेस्टीन्स नामक ड्रग्ज आहेत, फलित बीजांडं गर्भाशयाच्या अंतर्भागाशी जुळल्यानंतर प्रेग्नन्सीची वाढ होणं ते थांबवतात.

दुसरी गोष्ट अशी की, सर्वसाधारण स्त्री हॉर्मोन्स असलेल्या आय-पिल सारख्या कॉन्ट्रॅसेप्टिव पिल्स मुळातच प्रेग्नन्सीला अटकाव करतात आणि म्हणून गर्भपात घडवत नाहीत.

अधिक माहितीसाठी, येथे क्लिक करा

 
 
 
 
  आय-पिल मला जास्तीत जास्त लाभदायक कशी ठरेल?
 

असुरक्षित संभोगानंतर किंवा गर्भनिरोधक अपयशी ठरल्यास शक्य तितक्या लवकर घेतल्यास (मात्र 72 तासांच्या आत) आय-पिल उत्तम प्रकारे काम करते.

 
 
 
 
  आय-पिल किती प्रभावी आहे?
 

आय-पिल जितक्या लवकर घ्याल तितकी जास्त प्रभावी ठरते. असुरक्षित संभोगानंतरच्या 24 तासात 95% प्रभावी, 24 ते 48 तासात 85% प्रभावी आणि 49 ते 72 तासात घेतल्यास 58% प्रभावी ठरते. परंतु तुमच्या पाळ्या एक आठवड्याहून जास्त उशीरा येऊ लागल्या तर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्यायला हवी आणि डॉक्टरांना भेटायला हवे.

 
 
 
 
  आय- पिलमुळे मला साइड इफेक्ट्स होतील का?
 

आय-पिलमुळे दीर्घकालीन किंवा गंभीर साइड इफेक्ट्स उद्भवत नाहीत आणि साधारणत: प्रत्येक स्त्रीने घेण्यास ती सुरक्षित आहे.

मळमळ, उलट्या आणि डोकेदुखी हे काही सर्वसाधारण साइड इफेक्ट्स आय-पिल घेतल्यानंतर उद्भवतात. ओटीपोटात काहीशा कळा येऊ शकतील किंवा आपले स्तन तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त मऊ झाल्यासारखे वाटतील. हे सारं एक-दोन दिवसांत थांबायला हवं. योनीतून अनपेक्षित रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते, पण हे धोकादायक नाही आणि तुमच्या पुढच्या पाळीच्या वेळी ही तक्रार राहणार नाही. आय-पिलमुळे तुमची पुढची पाळी नेहमीपेक्षा लवकर किंवा उशीरा येण्याची देखील शक्यता आहे. परंतु तुमची पाळी एक आठवड्यापेक्षा जास्त उशीरा आली तर मात्र तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्यावी आणि डॉक्टरांना भेटावे. तुमच्या भविष्यातील (आणि पाहिजे असलेल्या) प्रेग्नन्सीजवर आय-पिलचा कुठलाही ‍टिकाऊ प्रभाव राहणार नाही.

तुम्हाला लेवोनोर्जेस्ट्रेलची एलर्जी असल्यास आय-पिल घेऊ नये. आय-पिलमधील औषधाचे ते नाव आहे.

 
 
 
 
  आय- पिल घेण्यापूर्वी मला काही सावधगिरी बाळगली पाहिजे का?
 

आय- पिल घेण्यापूर्वी तुम्हाला पुढील गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे:

  • असुरक्षित संभोगानंतर किंवा गर्भनिरोधकाच्या अपयशानंतर शक्य तितक्या लवकर पण 72 तासानंतर नव्हे-आय-पिल सर्वोत्तम काम करते.
  • तुम्ही आधीच प्रेग्नन्ट असाल तर आय-पिल प्रभावहीन ठरते.
  • ती नेहमीची गर्भ निरोधक पद्धती म्हणूनही घेऊ नये.
  • आय-पिल एचआयव्ही/एड्स किंवा इतर लैंगिक संक्रमित विकारांविरूद्ध (STD) संरक्षण पुरवत नाही.
 
 
 
 
  आय-पिलने काम केले आहे हे मी कसे ओळखू?

 

आय-पिलने काम केले आहे किंवा नाही हे कळण्याचा कुठलाही ठोस पुरावा किंवा लक्षणे नाहीत. आय-पिल घेतल्यानंतर तुम्ही आपली पुढची मासिक पाळी अपेक्षित वेळी किंवा अपेक्षित वेळेच्या एका आठवड्यात येते की नाही यासाठी थांबणे आणि तशी अपेक्षा वाटणे आवश्यक आहे. तुमची पाळी जर एक आठवड्यापेक्षा जास्त उशीरा आल्यास प्रेग्नन्सी टेस्ट करून घेणे व डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल.
 
 
 
   
  नेहमीचे गर्भनिरोधक म्हणून मी आय-पिल घेऊ शकते का?
  नाही. नेहमीचे गर्भनिरोधक म्हणून आय-पिलची शिफारस केली जात नाही. असुरक्षित संभोगानंतर किंवा गर्भनिरोधक अपयशी ठरल्यास गर्भनिरोधकाला पूरक पद्धत म्हणून वापरली तर आय-पिल प्रभावी ठरते. नेहमीच्या गर्भनिरोधकाला पर्याय म्हणून आय-पिल घेतली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
 
 
 
   
  मी आय-पिल किती वेळा घेऊ शकते किंवा आय-पिल पुन:पुन्हा घेता येते का?
 

आय-पिल मासिक पाळी चक्रात मध्ये एकाहून जास्त वेळा घेता येईल, पण केवळ इमर्जन्सी कॉन्ट्रॅसेप्टिव म्हणूनच तिची शिफारस केली जाते.

नियमित गर्भनिरोधानासाठी आय-पिल योग्य पर्याय नाही. याची अनेक कारणे आहेत :

  • नियमित गर्भनिरोधनाची कुठलीही पद्धती ही अनेकवेळा वापरलेल्या 'ईसी' पेक्षा जास्त प्रभावी आहे.
  • दीर्घकालीन अती वापरामुळे अनियमित मासिक पाळी चक्र उद्भवू शकते.

तिच्यामुळे मळमळ आणि उलट्या यासारखे त्रासदायक साइड इफेक्ट्स होऊ शकतात. नको असलेली प्रेग्नन्सी टाळण्यासाठी गर्भनिरोधनाच्या नियमित पद्धती तुम्ही चालू ठेवण्याची दक्षता बाळगा.


 
 
 
   
  मी आधीच प्रेग्नन्ट असल्यावर आय-पिल घेतली तर?
  तुम्ही आधीच प्रेग्नन्ट असाल तर आय-पिल काम करणार नाही. तुम्ही आधीच प्रेग्नन्ट असताना आय-पिल घेतलीत तर तुम्हाला किंवा तुमच्या गर्भाला काहीही अपाय होणार नाही.
 
 
 
   
  माझी मासिक पाळी एका आठवड्यानंतर उशीराने आली आणि ओटीपोटात तीव्र वेदना होऊ लागल्या तर काय करावे?
  अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे, कारण इथे तातडीच्या औषधोपचाराची गरज असू शकेल.
 
 
 
   
  पुढची मासिक पाळी येईपर्यंतचे प्रभावी गर्भनिरोधक म्हणून आय-पिल काम करते का?
  अजिबात नाही. तुम्ही आय-पिल घेतल्यानंतर केल्या जाणार्‍या प्रत्येक संभोगानंतर पुढील मासिक पाळी येईपर्यंत तुम्ही कंडोम, स्पर्मिसाइड किंवा सर्वायकल कॅप असे गर्भनिरोधक वापरत असल्याची खात्री करून घ्या.
 
 
 
   
  थोड्या कालावधीत मी अनेक वेळा संभोग केल्यास आय-पिल प्रभावी ठरेल का?
  होय, थोड्या कालावधीत अनेक वेळा संभोग केल्यास आय-पिल तेवढीच प्रभावी ठरते. पण, सर्व संभोग क्रिया आय-पिल घेतल्यापासून 72 तासांच्या आत होतील याची काळजी घ्या.
 
 
 
   
  पुढील काही दिवसात (उदा. आठवड्याच्या अखेरच्या दीर्घ सुट्टीत) मी संभोग करीन हे मला ठाऊक असलं तर मी थांबून आय-पिल नंतर घेतली तर चालेल का? किंवा त्या कालावधीत मी केलेल्या प्रत्येक संभोगानंतर आय-पिल घेणं आवश्यक आहे?
  आय-पिल हे इमर्जन्सी कॉन्ट्रॅसेप्टिव आहे. जर तुम्ही प्रेग्नन्सी नकोच, या विचाराने ठरवून संभोग करणार तर नेहमीची गर्भनिरोधक वापरा. त्या करीता तुमच्या डॉक्टरचा सल्ला योग्य ठरेल.
 
 
 
   
  आय-पिल घेतल्यानंतर माझी पाळी कधी येईल?
  तुमची पुढची पाळी वेळेवर यायला हवी, पण ती काही दिवस लवकर अथवा उशीराही येऊ शकेल. मात्र, तुमच्या पाळीला एक आठवड्यापेक्षा जास्त उशीर झाला तर कृपया प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्या आणि तुमच्या डॉक्टरना भेटा.
 
 
 
   
  एचआयव्ही/एड्स यासारख्या लैंगिक संक्रमित विकारांपासून (STD) संरक्षण म्हणून आय-पिल मदत करते का?
  अजिबात नाही. आय-पिल तुमचे एचआयव्ही/एड्स किंवा इतर लैंगिक संक्रमित विकारांपासून संरक्षण करत नाही. STD पासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कंडोम वापरणे हिताचे ठरेल.
 
 
 
   
  मी स्तनपान करीत असताना आय-पिल घेऊ शकते का?
 

स्तनपानावेळी आय-पिल घेणं सुरक्षित आहे. बाळाला अपाय होईल अशा प्रकारचा कोणताही दुष्परिणाम आय-पिल मुळे आईच्या दुधावर होणार नाही.

 
 
 
   
  इमर्जन्सी कॉन्ट्रॅसेप्टिव अपयशी ठरले तर माझी प्रेग्नन्सी मी पुढे चालू ठेवू शकते का?
  तुमची तशी इच्छा असेल तर तुम्ही प्रेग्नन्सी चालू ठेवू शकता. आय-पिल मध्ये वापरलेल्या औषधाने तुम्हाला किंवा तुमच्या होणार्‍या बाळाला काहीही अपाय होणार नाही.
 
 
 
   
  ज्यासाठी दीर्घकाळ औषध घ्यावे लागते असा आजार (दमा, उच्च रक्तदाब, मधुमेह, क्षय, एचआयव्ही- एड्स इ.) मला जडला असेल तर आय-पिल माझ्यासाठी सुरक्षित आहे का?
  अशा परिस्थितीत आय-पिल घेण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.
 
 
 
   
  आय-पिल घेतल्यानंतर मला उलटी झाली, तर मी आय-पिल पुन्हा घ्यायची का?
  गोळी घेतल्यानंतर तीन तासात तुम्हाला उलटी झाली तर तुम्ही दुसरी गोळी शक्य तितक्या लवकर, प्रामुख्याने अ‍ॅन्टी-एमेटिक्सबरोबर (उलटी व मळमळ यावर गुणकारी असे ड्रग) घ्यावी. भरल्यापोटी आय-पिल घेतल्यास उलटी होण्याची शक्यता फारच कमी असते.
 
 
 
   
  मला माझ्या नेहमीच्या गर्भनिरोधक गोळ्या घ्यायला पुन्हा केव्हा सुरूवात करता येईल?
  आय-पिलच्या वापरानंतर, तुमच्या नेहमीच्या गर्भनिरोधक गोळ्या तुम्ही लगेचच दुसर्‍या दिवसापासून सुरू करू शकता.
 
 
 
   
  आय-पिल कुठे मिळेल?
  तुमच्या जवळच्या केमिस्टकडे डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय मिळेल.
 
 
 
   

 

 

 

i-pill
i-pill is available without a prescription at all chemist outlets. i-pill is not an abortion pill.

Mail this page  |  Print this page

 
For more information call the i-pill helpline at 1800-22-9898 or 022-3200 0055
Important safety aspects: i-pill is neither a regular contraceptive nor an abortion pill. It is not a substitute for condoms and
does not protect against sexually transmitted diseases including HIV/AIDS.